सून सासूच्या प्रेमात, पतीसोबत झोपू देत नव्हती, सासू नाराज

शनिवार, 27 एप्रिल 2024 (16:50 IST)
Daughter-in-law falls in love with mother-in-law सासू आणि सून यांच्यात सहसा भांडणे होत असतात, पण एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये सासू नाराज झाली आहे ते पण सुनेच्या प्रेमामुळे. सासू इतकी नाराज झाली की तिने आपल्या सुनेच्या कृतीचे सर्व तपशील व्हिडिओमध्ये कथन केले. सासू-सुनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
व्हिडिओमध्ये सासू काय म्हणाली: व्हिडिओमध्ये महिला सांगत आहे की, तिच्या मुलाचे एका मुलीशी लग्न झाले आहे. 6 महिन्यांनंतर सुनेचा स्वभाव बदलला आणि तिने सासूजवळ झोपण्याचा हट्ट सुरू केला. सासूने सांगितले की, तिच्या सुनेला पती सोडून त्याच्यांसोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत.
 
सून बघताच सासूच्या प्रेमात पडली : महिलेने सांगितल्याप्रमाणे सुनेने जेव्हा सासूला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच तिच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. सून म्हणते की माझं लग्न तुमच्यासोबत व्हायला हवं होतं. मुलाशी लग्न करून मला तुमच्यासोबत राहाण्याची इच्छा होते. महिलेने सांगितले की, सून म्हणते की तुला भूल देऊन मी असे काही करेन की तुला कुठेही तोंड दाखवता येणार नाही.
 

If you are tired of reading news of illicit relationships on a daily basis then you will find this one new and unique. A Daughter in Law fall in Love with her Mother In Law and now she is forcing her Saas to have sexual relation with her in Bulandshahr, UP. She even not allowing… pic.twitter.com/i32AlObHeu

— NCMIndia Council For Men Affairs (@NCMIndiaa) April 26, 2024
शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न : सासूने सांगितले की, सून शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करते. मी तिला म्हणले की आम्ही सासू आणि सून आहोत, मी पण तुझ्यावर माझी सून म्हणून प्रेम करते, पण ती म्हणते की तिला 'तशा प्रकाराचे' प्रेम करायचे आहे. सासू म्हणते की, जेव्हा मी तिला हे चुकीचे आहे असे सांगते तेव्हा ती मला मोबाईलवर अशा मुलींची उदाहरणे आणि बातम्या दाखवते. ती फोनवर व्हिडिओही दाखवते.
 
मुलीच्या कुटुंबीयांकडून हुंड्याची मागणी : महिलेने सांगितले की, आम्हाला या मुलीपासून मुक्त व्हायचे आहे, मात्र उलट मुलीचे कुटुंबीय आमच्याकडे हुंड्याची मागणी करत आहेत. सुनेचे कुटुंब 20 लाखांची मागणी करत असल्याचे सासूचे म्हणणे आहे. मात्र हा व्हिडीओ कुठचा आहे आणि त्यात किती तथ्य आहे हा तपासाचा विषय आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती