'वडा पाव' विकणारी ही रडणारी मुलगी कोण आहे?व्हिडीओ व्हायरल!

शनिवार, 16 मार्च 2024 (11:36 IST)
हे सोशल मीडियाचे युग आहे, दररोज असे व्हिडिओ या प्लॅटफॉर्मवर येतात जे काही वेळात व्हायरल होतात. सध्या दिल्लीत रस्त्याच्या कडेला असलेल्या एका गाडीतून वडा पाव विकणाऱ्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेक व्हिडिओंमध्ये ती रडताना आणि वडा पाव विकताना दिसत आहे.
 
ही मुलगी वडा पाव गर्ल या नावाने प्रसिद्ध झाली आहे. या गाडीवर वडा पाव खाण्यासाठी येणाऱ्या लोकांची लांबच लांब रांग लागली आहे. वडा पाव गर्लने बनवलेला मसालेदार वडापाव खाण्यासाठी लोक तासन्तास वाट पाहत असतात.
 
वडापाव विकणाऱ्या सुंदर मुलीचे नाव आहे चंद्रिका गेरा दीक्षित. ती दिल्लीची नसून मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील आहे. लग्नानंतर ती दिल्लीत आली आणि आधी एका प्रसिद्ध फूड चेन कंपनीत काम करत होती, पण तिच्या मुलाच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिला आणि तिच्या पतीला नोकरी सोडावी लागली. यानंतर कुटुंबाचे पोट भरण्यासाठी चंद्रिका गेरा दीक्षित आणि त्यांच्या पतीने वडा पाव स्टॉल सुरू केला. चंद्रिकाला स्वयंपाकाची आवड होती, त्यामुळे तिने हा छंद आपला व्यवसाय बनवला. यानंतर कुटुंबाचे पोट भरण्यासाठी चंद्रिका गेरा दीक्षित आणि त्यांच्या पतीने वडा पाव स्टॉल सुरू केला. चंद्रिकाला स्वयंपाकाची आवड होती, त्यामुळे तिने हा छंद आपला व्यवसाय बनवला.

चंद्रिका म्हणाली की, दिल्लीत साधारणपणे लोक वडापावऐवजी टिक्की ग्राहकांना खायला घालतात, पण मी मुंबईचा पारंपारिक स्टाइलचा वडा पाव बनवते आणि त्यामुळे लोकांना तो आवडतो.चंद्रिकाच्या हाताने बनवलेल्या वडापावची चव इतकी आहे की लोक त्यांची पाळी येण्याची दीड ते दोन तास वाट पाहत असतात. त्यांच्या स्टॉलवर सामान्य वडापावची किंमत फक्त 40 रुपये आहे तर स्पेशल वडापावची किंमत 70 रुपयांपर्यंत आहे.

या व्हिडीओ मध्ये चंद्रिका वडापाव बनवताना रडताना दिसत आहे. वडापाव विकणाऱ्या मुलीचे रडणे सर्वांचे लक्ष वेधत आहे. काही अधिकारी तिला स्टॉल लावण्यापासून रोखत आहे. आणि तिचा स्टॉल हटवण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या स्टॉलवर वडापाव खाणाऱ्यांची तुफान गर्दी पाहायला मिळते. ग्राहकांच्या वाढणाऱ्या गर्दीमुळे तिची चिडचिड होते. अनेक वेळा तिच्या गाडीवर गर्दी झाल्यामुळे वाहतूक कोंडी होते.  
 
 Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती