Viral Video 70 वर्षीय आजीने गंगा नदीत उडी घेतली

Webdunia
गुरूवार, 30 जून 2022 (11:19 IST)
हिंदूंसाठी गंगा नदी ही जगातील सर्वात पवित्र नद्यांपैकी एक आहे. गंगा नद्यांच्या काठावर पवित्र तीर्थक्षेत्रे आणि शहरे आहेत. भारतातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिद्वारला जगभरातून लोक भेट देतात. भाविक हरिद्वारला येतात आणि गंगेत स्नान करतात.
 
एका 70 वर्षीय महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ हर की पौरी, हरिद्वार येथील आहे. व्हिडिओमध्ये एका वृद्ध महिलेने पुलावरून गंगा नदीत उडी मारली आहे. हे पाहिल्यानंतर लोकांचा काही क्षणासाठी श्वासच थांबला.
 
 
नदीच्या लाटांसोबत ही महिला वाहून जाऊ नये, असे लोकांना वाटत असले तरी ती गंगामैयाचा आनंद लुटत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. सोशल मीडियावर वृद्ध महिलेचे धाडस पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. ही महिला हरियाणा राज्यातील जिंदे जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित माहिती

पुढील लेख