तिसरी आघाडी पत्त्यांप्रमाणे कोसळेल-सोनिया

तिसरी आघाडी ही संधीसाधूंची आघाडी असल्याचे सांगत ती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, असे भाकित कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले आहे.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांच्यासोबत एका संयुक्त निवडणूक प्रचार सभेत त्या बोलत होत्या. सत्ता प्राप्त करण्यासाठी संधीसाधू मंडळींनी एकत्र येऊन ही आघाडी स्थापन केल्याचे सांगून, असे विरोधाभासी भूमिका असणारे नेते एकत्र कसे काय येऊ शकतात? असा सवालही केला.

गेल्या लोकसभा निवडणुकीत काही पक्ष त्यांच्याबरोबर होते. यावेळी नव्या मंडळींबरोबर जात त्यांनी तिसरी आघाडी बनवली आहे. ही सगळी सत्ता प्राप्त करण्याची कसरत आहे. ही आघाडीच अपवित्र आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

वेबदुनिया वर वाचा