जयललिता म्हणतात, सर्व पर्याय खुले

तिसर्‍या आघाडीत असलेल्या अण्णा द्रमुकच्या प्रमुख जयललिता यांनी ऐन मतदानाच्या दिवशी कोलांटीउडी मारत निवडणूक निकालांतर काय करायचे ते आपण निश्चित करू असे सांगत सर्व पर्याय खुले असल्याचे स्पष्ट केले.

निवडणुकीनंतर काय करू हे आपण तेव्हाच ठरवू असे सांगून अनेक पर्याय समोर असले तरी सोळा मेनंतर याचा निर्णय घेऊ असे त्या म्हणाल्या. निकाल अनुकूल आल्यास दिल्लीतही जाऊ असे त्या म्हणाल्या.

वेबदुनिया वर वाचा