कॉंग्रेस मुख्‍यालयाबाहेर दिवाळी

मतमोजणीनंतरचे चित्र समोर येण्‍यास सुरूवात झाली असून अद्याप कुणाला स्‍पष्‍ट बहुमत मिळेल हे स्‍पष्‍ट झाले नसले तरीही कॉंग्रेसच्‍या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारकडे सत्ता जाणार हे चित्र स्‍पष्‍ट झाले आहे. त्‍यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्‍ये जोरदार उत्साहाचे वातावरण आहे.

कॉंग्रेस कार्यकर्त्‍यांनी दिवाळी साजरी करण्‍यास सुरूवात केली असून महाराष्‍ट्र, उत्तर प्रदेश आणि तमीळनाडूत पक्षाला अनपेक्षित यश मिळाल्‍याने कार्यकर्त्‍यांनी फटाके वाजविण्‍यास सुरूवात केली आहे. विशेषतः उत्तर प्रदेशात स्‍वतंत्र निवडणूक लढविण्‍याचा राहुल गांधी यांचा फॉर्म्युला हीट झाल्‍यानेही कार्यकर्त्यांचा जल्‍लोष जोरात आहे.

वेबदुनिया वर वाचा