लोकसभा निवडणुकीनंतर देशात कॉंग्रेसच्याच नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीचेच सरकार येईल, असा विश्वास द्रमुकचे अध्यक्ष एम. करूणानिधी यांनी येथे व्यक्त केला.
व्हिल चेअरवर बसून आलेले करूणानिधी मतदानानंतर पत्रकारांशी बोलत होते. तमिळनाडू व पुदुच्चेरीत द्रमुक व कॉंग्रेसच्या युतीचाच विजय होईल, असा दावाही त्यांनी केला. विरोधी आघाडीत बरेच पक्ष दिसत असले तरी कामाच्या जोरावर आमच्याच आघाडीचा विजय होईल, असे ते म्हणाले.