राहुल 'तापला' तर कॉग्रेस 'चमकेल'

यू पी एला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता पंतप्रधानपदाची माळ राहुल गांधी यांच्या गळ्यात पडण्याची चर्चाही लगोलग सुरू झाली आहे.

मतदार आणि सहकारी पक्षांच्या मनातील ही धास्ती पाहता पक्षाने पत्रकारपरिषद घेत राहुल हे या पदासाठी उमेदवार नसल्याचे जाहीर तर केलेच आहे, परंतु ते राजकारणाच्या उन्हात जितके तापतील तितकेच ते चमकतील असे सांगत आगामी काळात ते पंतप्रधान बनू शकतात असे संकेतही दिले आहेत.

कॉग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी राहुल यांच्याबद्दल हे मत व्यक्त केले असून, त्यांच्यात पंतप्रधान बनण्याचे सारे गुण असले तरी त्यांना यापदी बसवण्याची योग्यवेळ अजून आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा