रामपूरच्या निवडणुकीची हवा मतदानाच्या आधीच तापली असून आजम खान यांनी आपले अश्लील फोटो वाटप केल्याचा आरोप जयांनी मागे घेऊन त्याबदल्यात 24 तासांत लेखी माफी मागावी अशी तंबी दिली आहे. तसे न केल्यास आपण आपल्या मतदारांना आवाहन करून समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला मत न देण्याचे आवाहन करू अशी धमकीही त्यांनी दिली आहे. आजम यांनी निवडणुकींनंतर जया विरोधात खटला दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.