भारतातील सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेसला अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळताना दिसत आहे. कानपूरमधून केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल आघाडीवर आहेत. माजी क्रिकेटपटू अझहरूद्दीनही आघाडीवर आहे.
आतापर्यंत ४५ जागांचा कल जाहिर झाला असून त्यात कॉंग्रेसने भाजप, सपा व बसपाला मागे टाकले आहे.
कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी रायबरेलीहून, राहूल गांधी अमेठीतून, मुरादाबादमधून अझहरूद्दीन, फैजाबादमधून निर्मल खत्री, अमेठीतून राहूल ागंधी, कानपूरमधून श्रीप्रकाश जैस्वाल यासह अनेक जागांवर पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत.
बसपाचे उमेदवार सहारनपूर, आग्रा, आंबेडकरनगर, देवरीया बस्ती, बदायू, हरदोई, सीतापूर व बस्ती येथे आघाडीवर आहेत. भाजप आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोककदलाचे उमेदवार मथुरा, मुझफ्फरनगर व बिजनौरमधून आघाडीवर आहेत. एटाहून अपक्ष निवडणूक लढवत असलेले कल्याणसिंह आघाडीवर आहेत.
उत्तरखंडमधील पाच पैकी तीन जागांवर कॉंग्रेस आघाडीवर आहे. एका जागी भाजप पुढे आहे.
उत्तर प्रदेशचा कल- समाजवादी पार्टी 21 कांग्रेस 21 बसपा 15 राजग 12 अन्य 01