भाजपा महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष रुग्णालयात दाखल

बुधवार, 10 एप्रिल 2019 (09:34 IST)
लोकसभे साठी सुरु असलेल्या प्रचारात उन्हाच्या जबर तडाख्याने भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे आजारी असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहेत. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला असून, प्रचाराच्या रणधुमाळीत प्रदेशाध्यच आजारी पडल्याने भाजपमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दानवे स्वतः सुद्धा उमेदवार असून ते निवडणुकीला उभे आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महायुतीचे जालना लोकसभा मतदार संघातील उमेदवार रावसाहेब दानवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दानवे यांच्या प्रचारार्थ  रॅली काढली होती. रॅलीत भाजप, शिवसेनेसह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते. जेव्हा रॅली संपली तेव्हा  दानवे यांच्या प्रचारार्थ सभा देखील घेण्यात आली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेत घेतले होते. पाकिस्तानने भारतचे ४० अतेरिके मारल्याचे वक्तव्य केल्याने रावबाहेब दानवे अडचणीत आले असून त्यांच्यावर जोरदार टीका होत असून याचा काहीसा परिणाम निवडणुकीवर होईल असे दिसते आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती