मुख्य लढत : गिरीश बापट (भाजप) विरुद्ध मोहन जोशी (काँग्रेस)
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून काम पाहात आहेत. त्यांच्याकडे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, विजय काळे,जगदीश मुळीक अशी आमदारांची फौज प्रचारात सक्रीय होती.
मोहन जोशी यांनी १९९९मध्ये काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढली व ते पराभूत झाले होते. तेव्हापासून गेल्या वीस वर्षात त्यांनी कुठलीही निवडणूक लढलेली नाही. आजच्या पिढीला जोशी यांचा फारसा परिचय नाही. ते एकदा विधान परिषदेचे सदस्य होते. काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार मोहन जोशी हे अत्यंत निष्ठावान असे काँग्रेसजन आहेत. अनेक नेते काँग्रेस सोडून गेले पण जोशी यांनी कधीही पक्षाची साथ सोडली नाही. बापट यांचे ते जीवलग मित्र, पण हे दोन मित्र आज आमनेसामने आहेत.केवळ मोहन जोशीच नव्हेत तर बापट यांचे सर्वच पक्षांमध्ये मैत्र आहे.
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.