मुख्य लढत : भावना गवळी (शिवसेना) विरुद्ध माणिकराव ठाकरे (काँग्रेस)
भावना गवळी यांनी सलग चार वेळा लोकसभेत प्रतिनिधीत्व केले आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांना दोन लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे नेतृत्व करण्याची एकप्रकारे दुर्मिळ संधी मिळाली होती. ऑगस्ट २००८ मध्ये प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या ठाकरे यांनी या पदावर सहा वर्षे पूर्ण केली. राज्यात काँग्रेसचा सहा वर्षे एवढे दीर्घकाळ अध्यक्षपद भूषविणारे ठाकरे हे पहिलेच अध्यक्ष आहेत. १९९० च्या दशकात राज्य युवक काँग्रेसचे पाच वर्षे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. स्व.विलासराव देशमुख, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या तीन मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी काम केले आहे.