मुख्य लढत : डॉ. अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी दत्तात्रेय
इथे सिनेअभिनेते अमोल कोल्हे रिंगणात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राच्या आराध्य दैवातांवरील मालिकांमुळे प्रसिद्धीस आलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे शिरुर मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात आहेत. अमोल कोल्हे हे आधी शिवसेनेत होते. मात्र, राष्ट्रवादीत प्रवेश करत, शिरुरमधून ते शिवसेनेचे विद्यामन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना टक्कर देत आहेत. अमोल कोल्हे यांच्यासमोर मोठं आव्हान असलं, तरी मूळचे शिरुरमधील असलेल्या अमोल कोल्हे यांची या भागात लोकप्रियताही मोठी आहे.
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.