लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर सर्व कंपन्यांमधून वर्क फ्रॉर्म होमची सुरूवात झाली. पण यावेळी घरुन काम करताना व्हिडीओ संवाद खूप महत्वाचा ठरतो. ऑनलाइन मिटींग, कॉल, शिक्षण, मित्र आणि नातेवाईकांशी बोलण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉलचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे. त्याचप्रमाणे अनेक शाळांमध्ये देखील ऑनलाईन क्लासेसला सुरूवात झाली आहे. या क्षेत्रात काम करणार्या कंपनीचा व्यवसाय या काळात जोरदार वाढला आहे. गेल्या बर्याच दिवसांमध्ये, लोकांनी झूम अॅप वापरला आहे. त्यामुळेच या कोरोनाच्या काळात कंपनीची कमाई दुप्पट झाली आहे. कोरोनामुळे या कंपनीची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.