अफवा रोखण्यासाठी 'फॉरवर्ड मेसेज इंडिकेटर' फिचर आले

गुरूवार, 12 जुलै 2018 (08:27 IST)
अफवा, फेक न्यूज आणि फेक संदेश रोखण्यासाठी व्हाट्सअॅपने एक नवे फिचर सुरू केले आहे. या फिचरमुळे व्हाट्सअॅपवर येणारा मेसेज कुणी तयार केला आहे याचा पत्ता लागणार आहे. याचाच अर्थ फॉरवर्ड करत असलेला मेसेज हा तुमचा स्वत:चा आहे की, तो दुसऱ्याच कोणी तयार केला आहे, हे कळण्यास मदत होणार आहे. 'फॉरवर्ड मेसेज इंडिकेटर', असे या फिचरचे नाव आहे.
 
या फिचर्सची माहिती देण्यासाठी कंपनीने जगभरात अनेक पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. या पत्रकार परिषदेत सांगण्यात येत आहे की, यूजर्सला आलेल्या एकूण मेसेजपैकी किती मेसेज हे संबंधीत व्यक्तीने तयार केलेले नसून, ते कॉपी पेस्ट (फॉरवर्ड) आहेत हे समजू शकणार आहे. दरम्यान, हे नवे फिचर्स तुमच्या व्हाट्सअॅपमध्ये सुरू होण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपचे अपडेट असलेले व्हर्जन वापरावे लागेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती