मोबाईल चार्ज करताना नका करू या 5 चुका

चार्जिंग करण्याची सवय प्रामाणिक असावी म्हणजे मोबाईल अगदी 0 % पर्यंत डिस्चार्ज झाल्यावर चार्ज करायला हवं अशी सवय नको.
 
ज्या कंपनीचा मोबाईल आहे त्याच कंपनीचा चार्जर वापरावा. मोबाइल चार्ज व्हायला अधिक वेळ लागत असल्यास त्याच कंपनीचा दुसरा चार्जर वापरायला हवा.
 
महिन्यातून केवळ एकदा मोबाईल पूर्णपणे डिस्चार्ज करा आणि नंतर फुल चार्ज करून वापरा.
 
यूएसबी केबलने मोबाईल चार्ज होतो तरी फोनसोबत आलेला चार्जर वापरवा याने चार्जिंग स्पीड चांगली मिळते.
 
मोबाईल चार्जिंगवर असताना फोन वापरू नये. हे धोकादायक तर आहेच तसेच चार्जिंग करताना त्यावर व्हिडिओ बघणे किंवा गेम खेळल्याने लोड वाढतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती