WhatsApp च्या बीटा व्हर्जन मध्ये एक नवीन फीचर

शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (12:39 IST)
व्हाट्सअ‍ॅप नेहमीच आपल्या यूजर्सचा अनुभवाला सुधारण्यासाठी नवे-नवे फीचर्स घेऊन येतो. व्हाट्स अ‍ॅपच्या अँड्रॉइड यूजर्सला बीटा व्हर्जन मध्ये आता एक नवे कॅटलॉग मिळाले आहे जे बिझिनेस चॅटसाठी उपलब्ध असेल. नवीन कॅटलॉग शार्टकटसाठी अ‍ॅप मध्ये जागा बनविण्यासाठी व्हाट्सअ‍ॅपने आता व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंगच्या बटणांना एकत्र केले आहे. आता दोघांना एकत्रितपणे कॉलिंग बटण दिले जाणार आहे. तथापि, हे वैशिष्ट्ये केवळ व्यवसाय खात्यांसाठी आहे. सामान्य चॅट साठी कोणतेही बदल केले जाणार नाही. आणि हे वैशिष्ट्ये त्याचा साठी उपलब्ध नसणार.
 
WABetaInfo ने दिलेल्या वृत्तानुसार अँड्रॉइड साठी व्हॉट्सअ‍ॅप व्हर्जन 2.20.201.4 बीटामध्ये नवीन कॅटलॉग शॉर्टकटला जागा देण्यासाठी एक नवीन बटण सादर केले गेले आहे. बटणावर टॅप केल्यावर युजर्सला एक नवीन मेनू दिसेल ज्यामध्ये आपण जाऊन व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंग करण्याची निवड करू शकाल.
 
नवीन फीचर्स कॅटलॉग शॉर्टकट अपडेट करण्याचा उद्देश्य व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या यूजर्सच्या उत्पादनाचे संरक्षण करणे आणि त्यांना क्विक ऍक्सेस प्रदान करणे आहे.
 
व्हॉट्सअ‍ॅप बीटा प्रोग्रॅमचा भाग बनल्यावर नवीन बीटा आपल्या स्मार्टफोन मध्ये डाउनलोड केलं जाऊ शकतं. नवीन व्हॉट्सअ‍ॅप बीटा व्हर्जन एपिके मिरर द्वारे उपलब्ध होऊ शकेल. अलीकडील झालेल्या बीटा रिलीज मध्ये व्हॉट्सअ‍ॅपने मल्टी डिव्हाईस फीचर्स आणि वॉलपेपर कस्टमायझेशन या सारख्या फीचर्स येण्याचे संकेत दिले आहेत ज्याची यूजर्स अगदी आतुरतेने वाट बघत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती