जिओ फोन-2 चा सेल आता 6 सप्टेंबरपासून

सोमवार, 3 सप्टेंबर 2018 (14:26 IST)
रिलायन्स जिओने कमी कालावधीत मोबाइलच्या मार्केटमध्ये प्रवेश करत दाणादाण उडवून दिली आहे. नुकत्याच आलेल्या कंपनीच्या जिओ फोन-2 लाही ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. 
 
याआधी कंपनीने 16 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट रोजी 2 फ्लॅश सेल जाहीर केले होते. त्याला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. अवघ्या काही मिनिटात ऑनलाइन उपलब्ध असलेला हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाला. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून कंपनीने आपल्या या मॉडेलच्या पुढील फोनची तारीख जाहीर केली असून ज्यांना याआधी हा फोन खरेदी करता आला नाही, त्यांना आता संधी मिळणार आहे. 
 
6 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ग्राहकांना हा फोन www.jio.com या वेबसाईटवर आणि myjio app वर हा फोन खरेदी करता येणार आहे. नव्याने आलेल्या या फोनमध्ये व्हॉट्‌सअ‍ॅपची सुविधा देण्यात आली आहे.
 
यु ट्यूब, गुगल मॅप्स आणि फोसबुकचे इनबिल्ट अ‍ॅप ही या नव्या फोनची वैशिष्ट्‌ये आहेत. दिसायला हा फोन जुन्या ब्लॅकबेरी फोनप्रमाणे असून या फोनची किंमत 2,999 रुपये आहे. 
 
लवकरच आपण या फोनमध्ये व्हॉट्‌सअ‍ॅपची सुविधाही देणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. फोनमध्ये 512 एबी रॅ आणि 4 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच मेमरी कार्डद्वारे हे स्टोरेज 128 जीबीपर्यंत वाढवता येईल. या 4जी फोनमध्ये 2 हजार मिलिअ‍ॅम्पियर्सची बॅटरी आहे. यामध्ये वाय-फोय, ब्ल्यूटूथ, एनएफसी आणि एफएम रेडिओ यांसारखे कनेक्टिविटी फिचर्स देण्यात आले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती