रॉयल एनफिल्डचा तीन मिनिटांत स्टॉक संपला, सेल बंद

मंगळवार, 28 ऑगस्ट 2018 (15:26 IST)
रॉयल एनफिल्डनं भारतीय बाजारात आणलेल्या 'क्लासिक ५०० पेगासस'च्या लिमिटेड एडिशनचा स्टॉक अवघ्या तीन मिनिटांत संपला. खास भारतीय बाजारासाठी 'क्लासिक ५०० पेगासस'चे केवळ २५० युनिटस विक्रीसाठी ठेवले होते. यात ऑनलाईन विक्रीत केवळ १७८ सेकंदांत हे सगळे युनिटस विकले गेले. यासाठी कंपनीनं 'क्लासिक ५०० पेगासस'ची २.४९ लाख रुपये किंमत निर्धारीत केली होती. पहिल्यांदा कंपनीनं या बाईकच्या ऑनलाईन विक्रीसाठी १० जुलै ही तारीख निश्चित केली होती. वेबसाईट क्रॅश झाल्यानं २५ ऑगस्ट २०१८ ही तारीख निश्चित करण्यात आली. ठरल्यानुसार, २५ तारखेला सायंकाळी ४ वाजता या बाईकची ऑनलाईन विक्री खुली झाली... आणि पुढच्या केवळ तीन मिनिटांत या बाईकचा निर्धारित करण्यात आलेला स्टॉक संपला आणि सेल बंद करावा लागला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती