श्रीदेवींची शेवटची 30 मिनिटं

24 फेब्रुवारी, शनिवारी मध्यरात्री दुबईत श्रीदेवी यांचे निधन झाले. शेवटल्या क्षणांमध्ये नेमकं काय घडलं या बाबत कपूर कुटुंबीयातील काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यूएईच्या खलीज टाइम्सने शेवटल्या 30 मिनिटांची कहाणी छापली आहे. 
 
त्याप्रमाणे पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी व काही नातेवाईकांसोबत श्रीदेवी लग्न समारंभासाठी दुबईत आल्या होत्या. लग्न समारंभ आटपल्यानंतर काही नातेवाईक मुंबईला परतले तसेच बोनीही मुंबईला परतले होते. श्रीदेवी दुबईतच जुमैरा एमीरैट्स टॉवर्स या हॉटेलमध्ये थांबलेल्या होत्या. 
 
बोनी शनिवारी रात्री पुन्हा दुबईला आले. बोनी यांचा श्रीदेवीला सरप्राइज डिनरवर घेऊ जायचा प्लान होता. हॉटेलला पोहचून त्यांनी श्रीदेवीला उठवले आणि त्यांच्याशी 15 मिनिटांपर्यंत गोष्टी केल्या. डिनरसाठी त्यांना इनवाइट केले. तयार होण्यासाठी श्रीदेवी वॉशरुममध्ये गेल्या. नंतर 15 मिनिटे झाल्यावरही त्या बाहेर आल्या नाहीत तेव्हा बोनी यांनी वॉशरुमचा दरवाज ठोठावला. पण तरही श्रीदेवी यांनी दार उघडले नाही. बोनी यांनी जोरचा धक्का देत वॉशरुमचा दरवाज उघडला. त्यावेळी श्रीदेवी बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या दिसल्या. त्यांच्या प्रयत्नांने त्या शुद्धीवर येत नव्हत्या म्हणून बोनी यांनी आपल्या मित्राला फोन केला. 
 
नंतर पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती