मुंबई शेअर बाजारात विक्रमी वाढ

सोमवार, 6 ऑगस्ट 2018 (15:23 IST)
मुंबई शेअर बाजारात विक्रमी वाढ होत निर्देशांक ३७ हजार ७१४. ७० वर सुरू झाला आणि उसळी घेत ३७ हजार ८०५.२५ पर्यंत पोहोचला. तर निफ्टीची सुरुवात ११ हजार ३९०.५५ वर झाली आणि तो ११ हजार ४२७. ६५ पर्यंत पोहचला. याआधी सेंसेक्सने १ ऑगस्टला ३७ हजार ७११ चा टप्पा गाठला होता. त्याच दिवशी निफ्टी ११ हजार ३९० पर्यंत पोहोचला होता.
 
कन्झ्युमर, ड्युरेबल्स, पीएसयू, बँकिंग, हेल्थकेअर, मेटल, पॉवर, इन्फ्रास्ट्रक्चर, आयटी, टेक, ऑटो, एफएमसीजी आणि आइल अँड गॅस क्षेत्रात सोमवारी चलती होती. तर आयसीआयसीआय आणि स्टेट बँकेच्या शेअरमध्ये २.५ टक्क्यांची वाढ झाली. यस बँक, अॅक्सिस बँक, वेदांता आणि टाटा स्टीलच्या शेअरमध्ये १.५ टक्क्यांची वाढ दिसून आली. सरकारी आणि सार्वजनिक बँकांच्या शेअरची खरेदी वाढल्याने बँक निफ्टीने पहिल्यांदाच २७, ९०० चा टप्पा पार केला. मोठ्या कंपन्यांच्या शेअरसह मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरमध्येही तेजी दिसून आली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती