पुलावामा हल्ल्यानंतर भारतीयांना संतापापेक्षा ही अधिक ‘दुःख’ झाले होते

मंगळवार, 12 मार्च 2019 (10:08 IST)
सोशल मीडियावरील गतीविधींमधून जनमानसाचा मागोवा घेण्याचा अॅम्प्लिफायडॉटएआयचा प्रयत्न ~
 
सोशल मीडियाने कोट्यावधी भारतीयांना आपले मत मांडण्यासाठी एक मंच दिला आहे. पुलवामाला झालेल्या दुर्दैवी आणि घातक हल्ल्याला प्रतिक्रिया देताना भारतीय नागरिक आपल्या सोशल हॅंडल्सच्या माध्यमातून सतत आपली चिंता, विचार आणि प्रार्थना व्यक्त करत आहेत. यावेळी व्यक्त झालेल्या भावनांमध्ये संतापापेक्षा ही अधिक दुःख आढळून आले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) उपयोग करून प्रमुख आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर कंपनी अॅम्प्लिफायडॉटएआय (Amplicy.ai) सोशल मीडियावरील गतीविधींमधून जनमानसाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला.
 
१०० दशलक्ष फेसबुक “एंगेजमेंट्स” (टिप्पण्या, लाइक्स, प्रतिक्रिया आणि संदेश)च्या डेटासेटवर काम करून अॅम्प्लिफायडॉटएआयने दुर्दैवी हल्ल्याच्या आणि त्यावरील सरकारी प्रतिक्रियेच्या बातमीवर भारतीयांनी आपल्या भावना फेसबुकच्या माध्यमातून कशा प्रकारे व्यक्त केल्या हे जाणून घेतले. त्यांना आढळले की, मागील ३० दिवसांच्या सरसरीच्या तुलनेत हल्ल्यानंतर शुक्रवारी आणि शनिवारी एकूण वापरकर्ते सक्रिय असण्यातली वाढ १.३ पट होती ज्यात ज्यात “दुःखी” आणि “संतप्त” या भावनांचे एकत्रित प्रमाण १० पटींनी वाढले होते. टिप्पण्या आणि मेसेंजरने येणारे इनबाउंड संदेश सुमारे २.५ पटींनी वाढले त्यापैकी अॅम्प्लिफायडॉटएआय च्या एआय-प्रेरित एंगेजमेंट अॅनलायझर अनुसार नकारात्मक संदेश ५ पटींपेक्षा जास्त वाढले होते.
 
या दरम्यान 'दुःखी' प्रतिक्रियेचा वापर ५ पटींनी वाढला होता तर संतप्त प्रतिक्रेयेचा वापर २ पटींनी वाढला होता. 'हाहा' प्रतिक्रियेचा वापर नेहमीपेक्षा १/६ ने कमी झाला होता तर 'वॉव' प्रतिक्रियेचा वापर २/३ ने कमी झाला होता. तर 'हार्ट' प्रतिक्रियेचा वापर १/२ ने कमी झाला होता.   
 
या दुर्घटनेच्या संदर्भात भारतीयांना आपल्या भावना व्यक्त करणे गरजेचे वाटले, ज्यामुळे फेसबुकवर प्रचंड प्रमाणात एंगेजमेंट वाढली व त्यात सार्वजनिक टिप्पण्या आणि खाजगी संदेशांचे प्रमाण खूप वाढले. रियल टाइममध्ये झालेल्या डिजिटल एंगेजमेंटच्या वाढत्या प्रमाणाचा अर्थ लावण्यात एआय सर्वात मोठी भूमिका बाजावेल अशी अॅम्प्लिफायडॉटएआयला आशा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती