मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याची अजून एका घटना घडली आहे. बेरोजगार तरुणाने मंत्रालया समोर आत्महत्येचा प्रयत्न केला, मंत्रालयाच्या गार्डन गेटवर तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला असून, पोलिसांनी तरुणाला वेळीच अडवत त्याला ताब्यात घेतले आहे. मंत्रालया समोर तरुणाने अंगावर रॉकेल घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्या मागे तो सोन्या-चांदीच्या व्यापारात कर्जबाजारी झाला होता त्यामुळे बेरोजगार झाला आणि स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे. विनायक बाळासाहेब वेदपाठक असे त्याचे नाव आहे. तरुणाला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या विषया संदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरुन आपली प्रतिक्रिया देत सरकारवर टिका केली आहे. सदरची घटना दुर्दैवी असून सरकार रोजगार निर्मीती करण्यात अपयशी ठरले आहे. तेंव्हा या सकारला धडा शिकवा आत्महत्या करुनका असे ते म्हणाले आहेत.