झुकेरबर्गला 'या' तरुणीने मागे टाकले

शुक्रवार, 13 जुलै 2018 (16:12 IST)
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गला जगातील श्रीमंताच्या यादीत २० वर्षीय तरुणीने मागे टाकले आहे. केली जेनर असे नाव असलेल्या तरुणीची संपत्ती ६१ अब्ज ७४ कोटी इतकी आहे.
 
केली जेनर ही मॉडेल, अभिनेत्री किम कार्दाशिअनची सावत्र बहिण आहे. तिची स्वत:ची ‘केली कॉस्मेटीक्स’ नावाची सौदर्यप्रसाधानांची कंपनी आहे. या कंपनीत ओठांना आकर्षक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सौदर्य प्रसाधनांचे उत्पादन केले जाते. कंपनीचे सध्याचे एकूण बाजारमूल्याच्या ५४ अब्ज इतके असल्याचे फोर्ब्स या मासिकाने म्हटले आहे. 
 
केलीने ३ वर्षांपुर्वी एका कॉस्मेटीक कंपनीची सुरुवात केली होती. या कंपनीची ती एकटी मालक आहे. कंपनीने १५०० रुपयांच्या लिप किटच्या उत्पादनापासून आपल्या व्यवसायाला प्रारंभ केला होता. त्यानंतर तीनच वर्षांत केलीने अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले. विशेष म्हणजे कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या तिच्या या कंपनीत ७ पूर्णवेळ आणि ५ अर्धवेळ काम करणारे कर्मचारी आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती