'अलीबाबा'चे सहसंस्थापक जॅक मा यांची निवृत्तीची घोषणा

शनिवार, 8 सप्टेंबर 2018 (15:58 IST)
चीनची ई-कॉमर्स कंपनी 'अलीबाबा'चे सहसंस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष जॅक मा यांनी निवृत्तीची घोषणा केलीय. येत्या सोमवारी ते निवृत्ती स्वीकारणार आहे. यानंतर शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलीय. 'न्यूयॉर्क टाईम्स'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत जॅक मा यांनी आपली 'सेवानिवृत्ती एका युगाचा अंत नाही तर एका युगाची सुरुवात' असल्याचं म्हटलंय. यापुढे मला आवडणाऱ्या शिक्षण क्षेत्रातच मी माझा वेळ आणि पैसा गुंतवणार आहे, असंही त्यांनी म्हटलंय. जॅक मा निवृत्तीनंतरही अलीबाबा संचालक मंडळाचे सदस्य असतील. 
 
जॅक मा यांची चीनच्या अनेक घरांत एखाद्या देवाप्रमाणे पूजा केली जाते. अनेक घरांमध्ये तुम्हाला त्यांचे फोटो सहजच पाहायला मिळतात. अलिबाबाची वर्षभराची कमाई जवळपास 250 अरब युआन (40 अरब डॉलर) आहे. जॅक यांच्यावर एक वेळ अशीही आली होती जेव्हा केएफसी़नं त्यांना नोकरी नाकारली होती... परंतु, आता मात्र alibaba.com नावानं प्रसिद्ध असलेली त्यांची कंपनी जगातील 190 कंपन्यांशी जोडली गेलेली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती