ऑनलाइन व्यवहार करताना आता दरवेळी डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा 16 अंकी कार्ड क्रमांक टाकणे आवश्यक असेल. RBI च्या नवीन नियमानुसार आता ग्राहकाच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा क्रमांक, मुदत, नाव ही माहिती वेबसाईटवर सेव्ह करता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक व्यवहारावेळी 16 अंकी कार्ड क्रमांक आणि इतर माहिती द्यावी लागेल.
यापूर्वी डेबिट किंवा क्रेडिट कार्डं वापरून कोणताही ऑनलाइन व्यवहार करताना आपोआप साइटकडून विचारल्यावर डिटेल्स सेव्ह होत होते. जेणेकरून प्रत्येक व्यवहारावेळी 16 अंकी कार्ड क्रमांक आणि इतर माहिती द्यावी लागत नाही परंतू आता आरबीआयने काढलेल्या नव्या नियमानुसार ऑनलाइन व्यापारी, पेमेंट अग्रिगेटर आणि ई-कॉमर्स वेबसाईट्सना ग्राहकाच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा क्रमांक, मुदत, नाव ही माहिती त्यांच्या वेबसाईटवर सेव्ह करता येणार नाही. हा नियम जुलै 2021 पासून लागू होणार आहे. या नियमामुळे आता दरवेळी व्यवहार करताना ग्राहकाला कार्डमध्ये बघून किंवा अंक पाठ असतील तर त्याप्रकारे कार्डाची माहिती भरावी लागणार आहे.
RBI चा नवा नियम
आरबीआयच्या या नियामामुळे ग्राहकांच्या सुरक्षेत भर पडेल कारण ग्राहकाच्या कुठल्याही कार्डाचे डिटेल्स वेबासाईट्सकडे नसल्यामुळे ग्राहकाचे ऑनलाइन व्यवहार सुरक्षित होतील. ऑनलाईन सायबर गुन्हे प्रचंड वाढत असल्यामुळे हे पाउल उचलण्यात येत आहे. कारण वेबसाईटवर साठवलेली ही माहिती सुरक्षित आहे असं जरी या वेबसाइट्स सांगत असल्या तरीही तो डाटा हॅक करून त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो.