मालेगाव तालुक्यात अफुची शेती, ४७.५४ हजाराचे अफुची बोडं जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (07:57 IST)
गेल्या आठवड्यात सुमारे 58 किलोचा गांजा पकडल्यानंतर तालुका पोलिस ठाणे हद्दीत आता अफूची शेती मिळून आली आहे. घाणेगाव शिवारात पोलिसांनी छापा टाकून तब्बल 47 लाख 54 हजार रुपये किमंतीची 950 किलो वजनाची अफुची बोंडे जप्त केली असून, ही शेती पिकवणार्‍या तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात येत आहे.
 
गत आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेने टाकळी शिवारात गांजाची वाहतूक रोखली होती. त्यानंतर आता कृषिमंत्र्यांच्या तालुक्यात अफूच्या शेतीचा प्रयोग चर्चेत आला आहे. घाणेगाव शिवारात अफूची शेती केली जात असल्याची पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी जावून पाहणी केली असता शेतात अफूची रोपे मिळून आली. पथकाने बोंडे खुडली. त्याचे वजन सुमारे 950 किलो भरले. याप्रकरणी शेती करणारे रामेश्‍वर अंबादास संसारे, गोकुळ परशराम संसारे व निंबा चंदू शिल्लक यांच्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी ही कारवाई केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती