व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमाने व्हिडीओचे असे करा GIF फाईलमध्ये रुपांतर

मंगळवार, 17 मार्च 2020 (12:04 IST)
इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp)आपल्या युजर्सला चांगला अनुभव देण्यासाठी नवनवीन फीचर्स आणत असते. काही दिवसांपुर्वीच कंपनीने डार्कमोड फीचर रोल आउट केले होते. कंपनीने युजर्सचा चॅटिंग अनुभव मजेशीर करण्यासाठी GIF फीचर देखील सादर केले आहे. मात्र आता युजर्स स्वतःला हवे तशी GIF फाईल तयार करू शकतात.
 
अनेकदा चॅटिंग करताना GIF चा उपयोग करून एक्सप्रेशन शेअर केले जाते. मात्र स्वतः जीफ फाईल तयार करणे युजर्ससाठी मजेशीर असणार आहे.व्हॉट्सअ‍ॅपमध्ये कोणत्याही फाईलला जिफमध्ये बदलण्यासाठी तुम्ही फोनमधील कोणत्याही व्हिडीओचा वापर करू शकता. यानंतर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये जाऊन कोणत्याही नंबरवर चॅट विंडो उघडा. चॅट विंडोमध्ये खालील बाजूला अटॅचमेंट आयकॉन दिसेल. यात तुम्हाला गॅलेरीचा पर्याय निवडावा लागेल. गॅलेरीत जाऊन ज्या व्हिडीओला जिफमध्ये बदलायचे आहे, तो व्हिडीओ निवडा.
 
व्हिडीओ निवडल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर व्हिडीओ ट्रिम करण्याचा पर्याय मिळेल. याशिवाय डाव्या बाजूला तुम्हाला टेस्ट आणि इमोजीचा (Emoji’s) पर्याय दिसेल, जे तुम्ही व्हिडीओमध्ये जोडू शकता.
 
तुम्हाला जेवढी जिफ फाईल हवी आहे, तेवढा व्हिडीओ ट्रिम करा. यात तुम्हाला हवे असल्यास टेक्स्ट आणि इमोजी समावेश करा. यानंतर तुमचा व्हिडीओ जिफमध्ये बदलेल. ही फाईल तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती