Microsoft ला Android बनवू शकलो नाही ही माझी सर्वात मोठी चूक : बिल गेट्स

मंगळवार, 25 जून 2019 (16:30 IST)
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत माणूस आणि मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्स यांना या गोष्टीचा खंत आहे की त्यांचा Microsoft आज Google Android पेक्षा मागे राहून गेला आणि यासाठी ते स्वतःला दोषी ठरवतात. बिल गेट्स आपल्या एका वक्तव्यात म्हणाले, "माझी सर्वात मोठी चूक म्हणजे माझे कुप्रबंधन ज्यामुळे  Microsoft त्या जागी नाही पोहोचू शकलं जेथे Google Android आज आहे."
 
ते पुढे म्हणाले की Android बनविणे हे Microsoft साठी अत्यंत सोपी गोष्ट होती. बिल गेट्स यांना खंत आहे की त्यांनी Android बनविण्यासाठी Google ला एक संधी दिली. बिल गेट्स यांनी या गोष्टी एका व्हेंचर कॅपिटल फर्म, व्हिलेज ग्लोबलला अलिकडच्या मुलाखतीत सांगितल्या. खरंतर मोबाइलसाठी सध्या दोनच ऑपरेटिंग सिस्टम आहेत ज्यात Android आणि iOS सामील आहे. जगभरात सर्वात जास्त अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारेच आहे. या पूर्वी मायक्रोसॉफ्टने देखील नोकिया फोनला विंडोज सिस्टमसह सादर केलं होतं, जे 2017 पर्यंतच चालू शकलं. 
 
महत्त्वाचे म्हणजे Google ने या वर्षी Android ला 5 कोटी डॉलर्समध्ये विकत घेतलं होतं आणि आज अँड्रॉइड हे जगातील सर्वात लोकप्रिय मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम आहे. नुकताच Android चा 10वा व्हर्जन Android Q लॉन्च झाला आहे, जो या वर्षाच्या अखेरीस बरेच फ्लॅगशिप फोनमध्ये पाहायला मिळू शकतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती