सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल गायकवाड हा ३८ लाख ४१ हजार रुपये किंमतीचे परकीय चलन घेऊन परदेशात निघाला होता.याचवेळी सीमा शुल्क अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आल्याने त्याच्या बॅगेची कसून तपासणी केली , तेव्हा कुवेत, बहीरन, दुबई, ओमान अश्या अरब देशातील पैसे त्याच्या कडे आढळून आले. गायकवाड हा पुणे आंतरराष्ट्रीय विमानताळावरून एअर इंडीयाच्या विमानाने निघाला होता. उपायुक्त भारत नवले, अधीक्षक विनीता पुसदकर, माधव पाळनीतकर, सुधा अय्यर, निरीक्षक राजेंद्रप्रसाद मीना, अश्विनीकुमार देशमुख, अमजद शेख, देशराज मीना, यांच्या पथकाने ही कारवाई केली. आय आगोदर विमानाच्या बाथरूम मध्ये लाखो रुपयांचे सोने लपवलेले पोलिसांना मिळाले होते.