‘भीम’ अॅप आता ‘आधार’शी जोडणार

मंगळवार, 31 जानेवारी 2017 (17:09 IST)
सरकारने  डिजिटल इंडियासाठी  सुरु केलेलं ‘भीम’ अॅप आता ‘आधार’शी जोडण्यात आले आहे. त्यामुळे  आता भीम अॅप यूजर्स  12 डिजिट आधार कार्डचा नंबर वापरून डिजिटल व्यवहार करु शकतात. याशिवाय येत्या काही दिवसात सरकार ‘आधार पे’ देखील लाँच करणार आहे. आधार पे द्वारे बायोमेट्रिक पद्धतीनं तुम्ही व्यवहार करु शकता. हे फिचर लवकरच सुरु होणार आहे. ज्यामुळे व्हेरिफिकेशन आणि ओटीपीचीही गरज पडणार नाही. दरम्यान 14 बँकांनी आधार पे द्वारे व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. लवकरच इतर बँकाही ही सुविधा सुरु करेल.

वेबदुनिया वर वाचा