तसा, सचिन सोशल साईटस्द्वारे कधी-कधी तो काय करत असतो याची माहिती त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतो. सचिननं नुकताच आपला एक फोटो सोशल वेबसाईट फेसबुकवर अपलोड केलाय. यामध्ये, तो चक्क जेवण बनवताना दिसतोय.
सुटीसाठी सध्या मसूरीत असलेल्या सचिनने आपल्या तब्बल 45 मित्रांसाठी वांग्याचं भरीत बनवलंय आणि हा क्षण त्यानं कॅमेर्यात कैदही केलाय. आईने ही रेसेपी आपल्याला शिकवलं असल्याचंही त्यानं फोटोच्या बाजूला नमूद केलंय. या फोटोला आतापर्यंत एक लाख 32 हजार लाईक्स मिळाल्या असून 16 हजारांहून अधिक जणांनी हा फोटो शेअर केलाय.