ट्विटरआता नव्या रंगात, नव्या ढंगात

शुक्रवार, 25 एप्रिल 2014 (13:04 IST)
गेल्या काही महिन्यांपासून ट्विटर आपल्या नव्या लूकसाठी काम करत होतं. तो नवा लूक आता सर्वासाठी खुला करण्यात आला आहे. या नव्या लूकमध्ये फॉन्ट साईझ मोठी ठेवण्यात आली आहे. फोटो, प्रोफाईल हे सुद्धा मोठय़ा साईझमध्येच पाहायला मिळतात. तसंच युझर्सची माहिती आणि त्याने कधी ट्विटर अकाउंट ओपन केलं, याचं वर्षही नमूद करण्यात आले आहे. युझर्सचा फोटो आणि कव्हर पेज हे सुद्धा मोठं ठसठशीत दाखवण्यात आलं आहे. युझर्सच्या प्रोफाईल फोटोखाली त्याची माहिती आणि फोटोच्या वर म्हणजे फेसबुकप्रमाणेच कव्हर पेज डिझाईन करण्यात आलं आहे. मात्र फेसबुकपेक्षा हे भव्य आहे. महत्त्वाचं म्हणजे तुमचा एखादा ट्विट तुम्हाला नेहमी वर ठेवायचा असेल, तर त्यासाठीही फेसबुकप्रमाणेच ‘पिन’ हा पर्याय उपलब्ध आहे. त्याद्वारे तुम्ही तुमचा एखादा ट्विट नेहमी पहिल्या स्थानावर ठेवू शकाल. यानंतर केलेले सगळे ट्विट त्या ट्विटच्या खाली राहातील.

नव्या रंगात आणि नव्या ढंगात ट्विटरचा नवा लूक सर्वासाठी उपलब्ध झाला आहे. ट्विटरचा नवा लूक काहीसा फेसबुकसारखाच आहे. इथेही आता प्रोफाईल फोटोसोबत मोठा कव्हर फोटो ठेवता येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा