जग सोडून गेल्यानंतर आपल्या फेसबुक, ट्विटर अकाऊंटचं काय?

शनिवार, 8 ऑगस्ट 2015 (10:49 IST)
व्हर्च्युअल जगात वावरताना एखाद्या व्यक्तीचं फेसबुक अकाऊंट नाही, असा व्यक्ती क्वचितच सापडेल. सध्या तर फेसबुक आणि ट्विटरचं भूत लोकांच्या मानगुटीवरच बसलंय. पण, तुम्हाला माहीत आहे की एखादा व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या किंवा तिच्या फेसबुक आणि ट्विटर  अकाऊंटचं काय होतं?
 
तुम्हालाही या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर ते उत्तर तुम्हाला इथं मिळेल. खरं म्हणजे, एखादी व्यक्ती हे जग सोडून गेल्यानंतरही ती व्यक्ती फेसबुक आणि ट्विटरवर आठवणींच्या रुपात जिवंत राहू शकते. यासाठी फेसबुकनं आपल्या फिचर्समध्ये आणखी एक फिचर जोडलंय.. याचं नाव आहे ‘लिगसी कॉन्ट्रॅक्ट’. 
 
या फिचरमध्ये एखादी व्यक्ती आपलं फेसबुक अकाऊंट आपल्या एखाद्या कुटुंबीयाकडे किंवा मित्राकडे सोपवू शकतो. या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यानं ज्याच्याकडे आपलं फेसबुक अकाऊंट सोपवलं असेल त्या व्यक्तीकडे त्या फेसबुक पेजचे अधिकार राहतील.. शिवाय व्यक्ती मेल्यानंतर ज्या व्यक्तीकडे हे पेज सोपवलं असेल तो स्वत:ही हे पेज अपडेट करू शकतो. 
 
या लिगसी कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्ही निवडक व्यक्तींची माहिती आतापासूनच अपडेट करू शकता. पण, या फिचरमुळे तुम्ही ज्या व्यक्तीला हे अधिकार देताय ती व्यक्ती प्रोफाईल फोटो, कव्हर फोटो अपडेट, फ्रेंड रिक्वेस्टला उत्तर देणं अशी कामंही करू शकतो. परंतु, तुमचे खासगी मॅसेज मात्र वाचू शकणार नाही. 
 
तर ट्विटरवरही अशी व्यवस्था केली गेलीय.. ज्यामध्ये, एखादी व्यक्ती आता या जगात नाही अशी  ट्विटरला माहिती मिळाल्यानंतर  ट्विटर स्वत:च त्या व्यक्तीचं अकाऊंट डिअँक्टिव्हेट करून टाकतं.

वेबदुनिया वर वाचा