SRH vs KKR : कोलकाताला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कठीण आव्हान, फायनल सामना आज

रविवार, 26 मे 2024 (10:23 IST)
आयपीएल 2024 सीझनला दोन फायनलिस्ट सापडले आहेत आणि रविवारी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहेत.
 
आयपीएल 2024 चा अंतिम सामना रविवार, 26 मे रोजी कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात  चेन्नईतील एमए चिदंबरम म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर  संध्याकाळी साडेसात वाजता होणार. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल. 
 
या हंगामात दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली असून त्यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर कोलकाता आणि हैदराबाद हे संघ गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानी होते. 
 
हैदराबाद संघाने शुक्रवारी याच मैदानावर क्वालिफायर-2 मध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला होता. चेन्नईची खेळपट्टी साधारणपणे संथ असते जिथे फलंदाजांना वेगवान धावा करणे सोपे नसते. असाच काहीसा प्रकार क्वालिफायर-2 मध्येही पाहायला मिळाला, जिथे हैदराबादने खराब सुरुवातीनंतर राजस्थानसमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले आणि ते यशस्वीपणे गाठले. 
 
 कोलकाताकडे सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्तीसारखे अनुभवी फिरकी गोलंदाज आहेत जे हैदराबादच्या फलंदाजांसाठी अडचणी निर्माण करू शकतात. त्याच वेळी, हैदराबादकडे शाहबाज अहमद आणि अभिषेक शर्मा देखील आहेत ज्यांनी क्वालिफायर-2 मध्ये राजस्थानविरुद्धच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. 
 
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे...
 
सनरायझर्स हैदराबादः ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, अब्दुल समद, सनवीर सिंग, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, जयदेव उनाडकट, मयंक अग्रवाल, एडन मार्कराम, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, मयंक मार्कंडे, जे सुब्रमण्यन, फजलहक फारुकी, मार्को यानसेन, आकाश महाराज सिंग.
 
कोलकाता नाइट रायडर्स : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, मनीष पांडे, नितीश राणा, श्रीकर भारत, शेरफान रदरफोर्ड, दुष्मंथा चमीरा, अंगकृष्ण रघुवंशी, साकिब हुसेन, सुयश शर्मा, अल्लाह गझनफर, चेतन साकरिया.
 
Edited by - Priya Dixit
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती