खाते उघडण्यास दिल्ली सज्ज!

WD
दोन वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केल्याने आत्मविश्वास वाढलेला मुंबई इंडियन्स आज येथे दिल्ली डेअरडेव्हिल्ससोबत झुंजणार असून, हा सामना जिंकून आपली लय राखण्याचा प्रयत्न ते करणार आहेत, तर सलग दोन पराभव पत्करणारा दिल्लीचा संघ आपला पहिला विजय नोंदविण्याचा प्रयत्न करेल.

पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेजर्स बेंगळुरूकडून दोन धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर रिकी पॉटिंगच्या नेतृत्वातील मुंबईने शनिवारी चेन्नई सुपर किंग्सला नऊ धावांनी पराभूत केले. मुंबई इंडियन्स आपल्या अष्टपैलू खेळाडूंच्या बळावर स्पर्धेतील कोणत्याही संघाला टक्कर देऊ शकते, परंतु त्यांचे फलंदाज मात्र अपेक्षेनुसार प्रदर्शन करण्यात अपयशी ठरत आहेत. सचिन तेंडुलकर आणि पॉटिंगची सलामी जोडी आता घरच्या मैदानावर मुंबईला आपल्या आक्रमक फलंदाजीने चांगली सुरुवात करून देण्याचा प्रत्यन करतील. त्यांचा मुख्य वगवान गोलंदाज मलिंगा संघात दाखल झाला आहे.

दुसरीकडे आपले सुरुवातीचे दोन्ही सामने गमावणार्‍या दिल्लीचा संघ पहिला विजय नोंदविण्यास आतुल झाला आहे. त्यासाठी त्यांना केळाच्या संपूर्ण विभागात सुधारणा करावी लागेल. दिल्लीला पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून, तर दुसर्‍या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला होता. आता तिसर्‍या सामन्यात सेहवाग खेळणार असल्याने त्यांच्या फलंदाजीत थोडी बळटी येईल.

वेबदुनिया वर वाचा