मंगळवारी (26 एप्रिल) आयपीएलच्या 39व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची लढत राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. सलग दोन सामन्यांत पहिल्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर सर्वांच्या नजरा आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीवर असतील. गेल्या सामन्यातील फलंदाजांच्या खराब कामगिरीनंतर स्टार फलंदाज कोहली मोठी खेळी खेळेल आणि इतर फलंदाजही चांगली कामगिरी करतील, अशी आशा आरसीबीला असेल.
गेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नऊ गडी राखून पराभूत झाल्यानंतर बंगळुरूचा संघ या सामन्यात उतरणार आहे, तर राजस्थानच्या संघाने त्यांचे शेवटचे दोन्ही सामने जिंकले आहेत आणि चालू हंगामात ते उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.
सर्वांच्या नजरा कोहलीवर असतील पण कर्णधार फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमदसारखे फलंदाज मोठे फटके खेळण्यास सक्षम आहेत . त्याची बॅट खेळली तर राजस्थानच्या गोलंदाजांचा मार्ग सोपा होणार नाही.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवुड, मोहम्मद सिराज.
राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकिपर), शिमरॉन हेटमायर, करुण नायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबेद मॅककॉय, युझवेंद्र चहल.