IPL 2022 : सलग आठ पराभवानंतर मुंबईचा कोच महेला जयवर्धने निराश, भासली सुधार करण्याची गरज

सोमवार, 25 एप्रिल 2022 (17:28 IST)
Mumbai Indians in IPL 2022 : मुंबई इंडियन्स संघाचा हेड कोच महेला जयवर्धने आयपीएल 2022 मध्ये आपल्या संघाच्या खराब प्रदर्शनामुळे निराश झाला असून यामागे खराब फलंदाजी मुख्य कारण असल्याचं सांगत आहे. तसेच फलंदाजांना स्वत:च्या कामगिरीचा विचार करुन समीक्षण करण्याचीही गरज असल्याचं देखील तो म्हणाला.
 
मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 37 व्या सामन्यात लखनौच्या संघानं मुंबईला 36 धावांनी पराभूत केलं. या हंगामातील मुंबईच्या संघाचा सलग आठवा पराभव आहे. मुंबईच्या या पराभवानंतर कोच जयवर्धने म्हणाला, "मला फलंदाजांच्या कामगिरीचं समीक्षण करण्याची गरज आहे. कारण संघाने याआधी उत्तम प्रदर्शन केलं आहे. त्याच्या कामगिरीमुळेच पाच वेळा आयपीएलचा चषक उंचावला. मात्र आज फलंदाजांची खास कामगिरी न झाल्याने पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान गोलंदाजीतही काही सुधार करण्याची गरज असल्याचे त्याने म्हटले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती