व्लादिमीर पुतिन पुन्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले पाचव्यांदा घेतली शपथ

बुधवार, 8 मे 2024 (00:20 IST)
सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर व्लादिमीर पुतिन पुन्हा एकदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. सोमवारी त्यांनी क्रेमलिनमध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर समारंभाला संबोधित करताना पुतिन म्हणाले की, रशियाचे नेतृत्व करणे हे पवित्र कार्य आहे. या कठीण काळानंतर रशिया पुन्हा एकदा मजबूत होईल. रशिया इतर देशांशी संबंध विकसित करण्यास तयार आहे. प्रत्येक धोक्याला आणि आव्हानाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाला तयार राहावे लागेल. असं ते म्हणाले .
 
युक्रेनसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.
 
पुतिन यांनी पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सत्ता हाती घेतली आहे. देशात सार्वमताद्वारे मतदानाची प्रक्रिया तीन दिवस सुरू राहिली. पब्लिक ओपिनियन फाउंडेशन (एफओएम) च्या एक्झिट पोलनुसार, पुतिन यांना 87.8% मते मिळाली. रशियाच्या सोव्हिएटनंतरच्या इतिहासातील हा सर्वात मोठा निकाल आहे
 
Edited By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती