इस्राईल देशाशी ‘स्वराज’ यांचे घट्ट मैत्रीसंबंध होते- इस्राईल दूतावास

बुधवार, 7 ऑगस्ट 2019 (13:02 IST)
देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने देशात शोकमय वातावरण झाले आहे. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी आदरांजली वाहिली.
दरम्यान, भारतातील इस्राईलचे दूतावास रोन मलक हेदेखील सुषमा स्वराज यांच्या निधनाच्या वृत्ताने भावूक झाले आहेत.  सुषमा स्वराज यांच्या जाण्याने मोठे नुकसान झाले आहे. स्वराज यांचे इस्राईल देशाशी घट्ट मैत्रीसंबंध होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात इस्रायल-भारत संबंधात उल्लेखनीय प्रगती करण्यामागे मुख्य भूमिका बजावली होती, अशी भावना इस्रायल दूतावास यांनी व्यक्‍त केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती