तीन जहाजं बुडून फिलिपिन्समध्ये 31 जणांचा मृत्यू

सोमवार, 5 ऑगस्ट 2019 (12:49 IST)
फिलिपिन्समध्ये समुद्राच्या अजस्त्र लाटांमुळे तीन जहाजे बुडाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत तिन्ही जहाजांवरच्या जवळपास 31 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर तीन जण अजूनही बेपत्ता आहे. कोस्ट गार्डचे प्रवक्ते अरमंड बालिलो यांनी याविषयी माध्यमांना माहिती दिली. या जहाजांमध्ये जास्त करून गुइमारस आणि इलोइलो प्रांतातील लोक होते. हवामानाची स्थिती चांगली नसल्याने ही जहाजे बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
 
62 प्रवासी आणि क्रू मेंबर्सला सुरक्षितरीत्या वाचवण्यात आले आहे. बुडत्या तिसऱ्या जहाजात कोणताही प्रवासी नव्हता. त्यात असलेल्या पाच क्रू मेंबर्सला बचावण्यात आलं आहे. अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि जोराचे वारे वाहू लागले. त्यानंतर मुसळधार पाऊस कोसळला अन्‌ जहाज हेलकावे खाऊ लागले. त्यानंतर एक मोठी लाट आली आणि जहाजचं उलटले, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. तर दोन जहाजांची दुर्घटना झाल्यानंतरही तिसऱ्या जहाजाला पाण्यात उतरण्याची कशी काय परवानगी मिळाली, याबाबत अधिकाऱ्यांनी आश्‍चर्य व्यक्त केलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती