इजिप्तच्या किनाऱ्याजवळ पर्यटक पाणबुडी बुडाली, ६ जणांचा मृत्यू

गुरूवार, 27 मार्च 2025 (18:30 IST)
Egypt News: इजिप्तच्या किनाऱ्याजवळ एक पर्यटक पाणबुडी बुडाल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. तर  ९ जण जखमी झाले आहे अशी माहिती समोर आली आहे.
ALSO READ: दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार... आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी करत संजय निरुपम यांनी केले गंभीर आरोप
मिळालेल्या माहितीनुसार इजिप्तच्या किनाऱ्याजवळ एक पाणबुडी बुडाल्याने अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. इजिप्तच्या लाल समुद्रातील लोकप्रिय ठिकाण असलेल्या हुरघाडा येथे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे, जिथे एक पर्यटक पाणबुडी बुडाल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले.
ALSO READ: संतोष देशमुख: 3 आरोपीकडून गुन्ह्याची कबुली
इजिप्तच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. तसेच आपत्कालीन पथकांनी २९ लोकांना वाचवण्यात यश मिळवले. ही पाणबुडी पर्यटन रिसॉर्ट परिसरातील एका समुद्रकिनाऱ्यावरून जात होती. जहाजात वेगवेगळ्या देशांचे ४५ पर्यटक होते.   
ALSO READ: तारांच्या खालून आले ओळख लपवण्यासाठी ट्रान्सजेंडर बनले, मुंबई पोलिसांनी ८ बेकायदेशीर बांगलादेशींना पकडले
Edited By- Dhanashri Naik 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती