मिळालेल्या माहितीनुसारट्रम्प लवकरच पाकिस्तानसह ४१ देशांवर व्हिसा बंदी घालण्याचा आदेश जारी करू शकतात, ज्याचा थेट परिणाम या देशांच्या नागरिकांवर होईल. तसेच नवीन प्रवास बंदी यादीनुसार, ट्रम्प यांनी आधीच १० देशांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये अफगाणिस्तान, इराण, सीरिया, क्युबा आणि उत्तर कोरिया सारखे देश समाविष्ट आहे. या देशांच्या नागरिकांचे व्हिसा पूर्णपणे निलंबित केले जातील. याशिवाय, दुसऱ्या यादीत पाच देशांची नावे आहे, ज्यात इरिट्रिया, हैती, लाओस, म्यानमार आणि दक्षिण सुदान यांचा समावेश आहे. या देशांच्या नागरिकांचे व्हिसा अंशतः निलंबित केले जातील. याशी संबंधित व्हिसा श्रेणींमध्ये विद्यार्थी व्हिसा, पर्यटक व्हिसा आणि स्थलांतरित व्हिसा यांचा समावेश असू शकतो. ट्रम्प प्रशासनाने तिसऱ्या यादीत पाकिस्तान, भूतान आणि इतर २४ देशांचा समावेश केला आहे. या देशांच्या नागरिकांचे व्हिसा अंशतः निलंबित केले जातील आणि जर या देशांच्या सरकारने 60 दिवसांच्या आत व्हिसा प्रक्रियेत सुधारणा केली नाही तर व्हिसा पूर्णपणे निलंबित केले जातील. अशी माहिती समोर आली आहे.