सौदीच्‍या राजाने मुलाला बनवले प्रिन्‍स

गुरूवार, 22 जून 2017 (11:21 IST)
सौदी अरेबियाचे राजे किंग सलमान यांनी आपल्या पुतण्याला युवराज पदावरुन हटवले आणि त्‍याच्‍या जागी आपला मुलगा मोहम्मद बीन सलमान (वय ३१) याची युवराजपदावर निवड केली आहे. ही माहिती राज परिवारकडून प्रसिध्‍दीपत्रकाद्‍वारे देण्‍यात आली आहे. 
 
सौदीच्‍या राजाचा पुतण्या मोहम्मद बिन नायेफ (वय ५७) यास युवराजपदावरुन दूर करण्‍यात आले. शिवाय मंत्रीपदावरुनही हटवण्‍यात आले आहे. 
 
नवीन युवराज मोहम्मद बिन सलमान सध्या सौदीचे संरक्षणमंत्री आहेत. सलमान जानेवारी २०१५ मध्ये सौदीच्या राजगादीवर आले. सलमान युवराज होते तेव्हा मोहम्मद यांच्‍याकडे रॉयल कोर्टाची जबाबदारी होती. 
 
किंग सलमान यांनी पुतण्‍याला युवराजपदावरुन हटवून ज्‍याप्रकारे आपल्‍याला मुलाची निवड केली, यामुळे राजपरिवारात अनेकांना आश्‍चर्याचा धक्‍का बसला आहे. 

वेबदुनिया वर वाचा