कोरोना व्हायरसच्या थैमानमुळे अनेक गोष्टी बदलत आहे ज्यात एक मोठा बदल होणार आहे बार कल्चरमध्ये. लॉकडाऊनमुळे अनेक दिवस घरात बंद राहिल्यानंतर आता हळू-हळू जीवन पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. अनेक सुट देखील दिल्या जात आहे. अशात दक्षिण कोरियामध्ये देखील कोरोनावर मात करुन देश पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहेत.
सर्व दुकानं, रेस्टांरंट, बार सुरु केले जात असले तरी सोशल डिस्टन्सिंग हा सर्वात महत्त्वाचा उपाय सांगितला जातोय. यामुळेच आता बारमध्ये मालकांनी मुलींना रजा देत रोबोटची नियुक्ती केलीय.
हे रोबोट्स मद्य सर्व्ह करणे, कॉकटेल तयार करणे आणि इतर कामांमध्ये देखील मदत करणार आहे. बार व्यतिरिक्त हॉस्पिटल्स, दुकाने, आणि इतर ठिकाणी रोबोट्सच