कधी कधी जास्त हुशारपणा देखील अंगाशी येतो. सिंह हा जंगलाचा राजा म्हणवला जातो. सिंह सादासुदा प्राणी नसून हिंसक असतो. प्राणी संग्रहालयात देखील सिंह राजाच असतो. बऱ्याच वेळा प्राणी संग्रहालयात पिंजऱ्या पासून लांब राहा. प्राण्यांना त्रास देऊ नका. अशा प्रकारच्या पाट्या लिहिल्या जातात. मात्र काही जण या कडे दुर्लक्ष करतात आणि पिंजऱ्याजवळ जाऊन प्राण्यांना त्रास देतात. किंवा सेल्फी काढतात. कधीकधी जास्त हुशारी करणे महागात पडू शकते. असे काहीसे घडले आहे. आफ्रिकेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एका सिंहाने आपल्या जबड्यात एका व्यक्तीचा हात धरला आहे. तो व्यक्ती आपला हात सिंहाच्या जबड्यातून सोडवण्यासाठी आटापिटा करत आहे.
घडले असे. की एका प्राणी संग्रहालयात जातो आणि सिंहाच्या पिंजऱ्याजवळ जाऊन सिंहाला त्रास देण्यास सुरु करतो. कधी तो सिंहाची आयाळ ओढतो तर कधी त्याच्या तोंडात हात देण्याचा प्रयत्न करतो. पण पुढे काय होणार याची त्याला काहीच कल्पना नव्हती. त्याचे सिंहाशी खेळणे सुरुच असते. अचानक सिंह संधी साधून त्याचा हातच आपल्या जबड्यात घेतो. जिवाच्या आकांताने हा स्वतःला सोडवण्यासाठी पर्यंत करतो आणि जोरात ओरडत असतो. अखेर प्रयन्तांती त्याच्या हाताची सिंहाच्या जबड्यातून सुटका होते. या अपघातात त्याला त्याची बोट गमवावी लागली आहे.