चीनची वृत्तसंस्था ग्लोबल टाइम्सशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग म्हणाल्या की, "तैवानच्या नेत्यांनी केलेल्या पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनाबाबत चीन विरोध व्यक्त करत आहे. ज्या देशांचे चीनबरोबर राजकीय संबंध आहेत, त्यांच्या नेत्यांच्या तैवानच्या नेत्यांसी अधिकृत संवादाचा चीननं कायम विरोध केला आहे."
तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत माहिती दिली. "पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या निवडणुकीतील विजयाबाबत अभिनंदन. आम्ही तैवान आणि भारतातील संबंध वाढवण्यासाठी तत्पर आहोत. आम्ही व्यापार, औद्योगिक आणि इतर क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठीही तयार आहे. "