श्रीलंका प्रमाणे आता पेरूमध्ये पेट्रोलच्या दरवाढीमुळे संताप व्यक्त होत असून, लोकांचा निषेध होत आहे. अनेक शहरांमध्ये जाळपोळ आणि तोडफोड झाल्याच्या बातम्या आल्या. तेलाच्या किमती कमी करण्याची मागणी करत तेथील जनता रस्त्यावर उतरली आहे. यानंतर राष्ट्रपतींनी राजधानी लिमा आणि कालाओमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे.
जगभरात इंधन, गॅसच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे, ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत, पेरूमध्येही त्याचा परिणाम दिसून येत असून लोक संतापाने रस्त्यावर उतरले आहेत.
सोमवारी, निदर्शकांनी टोल बूथ जाळले आणि दक्षिणेकडील इका शहराजवळ पोलिसांशी चकमक झाली. शेतकरी आणि ट्रक चालकांनी लिमाकडे जाणारे काही मुख्य महामार्ग रोखले, ज्यामुळे अन्नधान्याच्या किमतीत अचानक वाढ झाली.