'जातीय जनगणना न करणे ही आमची चूक होती', ओबीसी परिषदेत राहुल गांधींचे मोठे विधान

शुक्रवार, 25 जुलै 2025 (17:11 IST)
आज ओबीसी परिषदेत राहुल गांधींनी एक भाषण दिले. ही परिषद दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये सुरू आहे, ज्यामध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, भूपेश बघेल आणि अशोक गेहलोत यांच्यासह अनेक काँग्रेस नेते सहभागी झाले होते.
ALSO READ: मस्कटहून मुंबईला जाणाऱ्या विमानात महिलेने दिला बाळाला जन्म
मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये काँग्रेसची ओबीसी परिषद सुरू आहे, ज्याचा उद्देश ओबीसी समुदायाचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सहभाग वाढवणे आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या 'भागीदारी न्याय संमेलनाला' संबोधित केले. आपल्या भाषणात ते म्हणाले की दलित आणि आदिवासींच्या समस्या समजून घेणे सोपे आहे, परंतु ओबीसी वर्गाचे प्रश्न आणि समस्या समजून घेणे खूप कठीण आहे. जातीय जनगणना न करणे ही आमची चूक होती, परंतु आता आम्ही वेळेत आमची चूक सुधारत आहोत. तसेच ओबीसींना संरक्षण न दिल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. 
ALSO READ: आठ महिन्यांच्या गर्भवती अल्पवयीन मुलीची आत्महत्या
राहुल गांधी म्हणाले की मी २००४ पासून राजकारणात आहे आणि आज जेव्हा जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला असे वाटते की मी अनेक चुका केल्या आहे. सर्वात मोठी चूक ओबीसी वर्गाबाबत झाली आहे. मी ओबीसी वर्गातील लोकांचे जशा रक्षण करायला हवे होते तसे केले नाही. कारण मी ओबीसी वर्गाच्या समस्या आणि मुद्दे खोलवर समजून घेऊ शकलो नाही. जर मला ओबीसी वर्गाचा इतिहास, संघर्ष, मुद्दे आणि समस्यांबद्दल माहिती असते तर मी जातीय जनगणना केली असती. चूक काँग्रेस पक्षाची नाही तर माझी आहे आणि आता मी माझी चूक दुरुस्त करणार आहे. असे देखील राहुल गांधी यावेळी म्हणाले. 
ALSO READ: शिर्डी : साई मंदिरात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ईमेल आला
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती